Breaking News

सिडकोची बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाई

उरण ः प्रतिनिधी

ग्रामीण भागातील 70 गावे आणि नवी मुंबई, खारघर, उलवे नोड, द्रोणागिरी नोड आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हेटवणे नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. याच जलवाहिनीला अनधिकृतपणे टॅब मारून पाण्याची नासाडी करणार्‍या बेकायदेशीर नळ जोडण्यांवर सिडकोने कारवाई केली आहे. त्यानुसार सुमारे 70हून अधिक नळजोडण्या वेल्डिंग मारून बंद करण्यात आल्या आहेत.  

हेटवणे नळ पाणीपुरवठा योजना सिडकोच्या मालकीची आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने 2002मध्ये एक लाख 13 हजार एमएलडी क्षमतेचे धरण पेण तालुक्यातील हेटवणे येथे कार्यान्वित केले असून, दिवसाला 310 एमएलडी पाणीपुरवठा करू शकेल एवढी क्षमता हेटवणे धरणाची आहे.

या जलवाहिनीतून ग्रामीण भागातील 70 गावे आणि नवी मुंबईसह इतर शहरांना दरदिवशी 150 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये खारघरला 65 एमएलडी, उलवे नोडला 25 एमएलडी, द्रोणागिरी नोडला 12 एमएलडी, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सहा एमएलडी पाणीपुरवठा हेटवणे धरणातून केला जात आहे.

मात्र हेटवणेच्या मुख्य जलवाहिनीलगतच्या गावांना मुबलक पाणीपुरवठा होत असताना हेटवणे ते नवी मुंबईपर्यंत 70हून अधिक चोरटे नळ कनेक्शन्स जोडले होते. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होते. या मोहिमेसाठी सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेश हटवार तसेच सहाय्यक अभियंता किशोर चांदेवर यांच्या पथकासमवेत होमगार्डची सुरक्षाही तैनात होती. यापुढे या जलवाहिनीवर अनधिकृतपणे टॅब मारून नळजोडण्या करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेश हटवार यांनी सांगितले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply