Breaking News

पनवेल महापालिका हस्तांतरण करात बदल

पनवेलः प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीतील हस्तांतरण करात बदल करण्यात आला असून आधीच्या कर आकारणी पद्धतीपेक्षा सरसकट कर आकारणी पद्धत लागू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बदलामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर प्रशासकीय काळामध्ये मालमत्ता हस्तांतरणावर बाजारमूल्यापेक्षा 0.2 टक्के अशा पद्धतीने कर लागू केला आहे.

हा कर आकारताना क्षेत्रफळानुसार अथवा हस्तांतरण प्रकरणानुसार कोणतीही वर्गवारी केली नव्हती. त्यामुळे मृत्युपत्राद्वारे, बक्षिसपत्र व वारसा हक्काने होणार्‍या हस्तांतरणालाही जास्त शुल्क द्यावे लागत होते. त्यामुळे पनवेल शहरातील 400 हून अधिक खटले प्रलंबित आहेत. पालिका क्षेत्राचा विचार केला तर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कर कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये पालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरण कर पद्धतीत बदल करण्याच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या करात बदल केल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच शहरातील 400 हून अधिक खटले वेगाने निकाली लागण्यास मोठी मदत होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply