Breaking News

कलादर्पण प्रस्तुत शब्दधन संस्थेचे काव्यसंमेलन

पनवेल : बातमीदार : ‘कलादर्पण’ प्रस्तुत शब्दधन संस्थेच्या वतीने नवीन पनवेल येथे एका काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील उद्योजक गिरिश समुुुुद्र यांच्या सौजन्याने हे संमेलन झाले. प्रसिद्ध साहित्यिक शंकर आपटे संमोलनाच्या अध्यक्षस्थानी होते. या संमेलनाला मधुमेहतज्ज्ञ डॉ. कीर्ती समुद्र, प्रसिद्ध दिग्दर्शक मोहन हिन्दुपूर, कवयित्री संगीता देशपांडे, गायिका पद्मजा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन झाल्यानंतर आयोजक गिरीश समुद्र यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर काव्यवाचनाला सुरुवात झाली. उपस्थित कवींनी विविध विषयांवर आधारित कविता सादर केल्या. यामध्ये पाऊस या विषयावर आधारीत कविता रसिकांना विशेष भावल्या. अनेक विडंबन काव्य, तसेच विनोदी कवितांनाही रसिकांनी हसून दाद दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कवी शंकर आपटे म्हणाले की, नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देणे हे या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संस्थेच्या माध्यमातून नेहमी अशी काव्यसंमेलने पनवेल परिसरात भरवली जातील. यातून प्रतिभासंपन्न काव्यनिर्मिती होऊन साहित्यक्षेत्रात पनवेलचे नाव अग्रक्रमावर येईल, असा विश्वास शंकर आपटे यांनी व्यक्त केला. श्रीनिवास काजरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. कीर्ती समुद्र यांनी आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply