Breaking News

धर्मुबाई ठाकूर यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या काकी धर्मुबाई नामदेव ठाकूर (रा. शिवाजीनगर, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 26) सकाळी 7च्या सुमारास वृद्धत्वाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

धर्मुबाई ठाकूर यांच्या अंत्ययात्रेला लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, तसेच श्रीधरशेठ ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, भरतशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर यांच्यासह गव्हाण पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

कै. धर्मुबाई ठाकूर यांचा होम विधी येत्या शुक्रवारी दि. 28 जून रोजी, दशक्रिया विधी पुढील शुक्रवारी दि. 5 जुलै रोजी श्रीक्षेत्र नाशिक येथे, तर उत्तरकार्य रविवार दि. 7 जुलै रोजी शिवाजी नगर येथे होणार आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply