Breaking News

श्रीवर्धनमध्ये सेक्स रॅकेट?

व्यापार्‍याकडे खंडणी मागणार्‍या सात जणांना अटक

अलिबाग : प्रतिनिधी

श्रीवर्धन शहरातील एका व्यापार्‍याकडे खंडणी मागणार्‍या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली. यात एक महिला, तसेच तोतया पत्रकाराचा समावेश आहे. दोन महिला फरार असून, त्यांचा शोध जारी आहे. वरवर हे प्रकरण खंडणीचे दिसत असले तरी हे सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भूषण पतंगे (29), विशाल मोरे (33), कुणाल बंदरी (28), अलका ठाकूर (65), सिद्धार्थ मोरे (27), अक्षय दासगवकर (सर्व राहणार अलिबाग), जगदीश ठाकूर (42, बोर्ली मांडला), अक्षय ठाकूर (25, माणगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मुख्य आरोपी पूजा व अनोळखी महिला फरार आहे.

श्रीवर्धन शहरातील एका व्यापार्‍याला या टोळीतील मुलीने आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर आपल्या साथीदारामार्फत ती या व्यापार्‍याला ब्लॅकमेल करू लागली. 24 जून रोजी पूजा हिने व्यापार्‍याला फोन करून तिच्या वडिलांच्या आजारपणाकरिता पैशाची गरज असल्याचे सांगितले, तसेच त्यासाठी काहीही करण्याची इच्छा दर्शविली. मग व्यापारी पूजाला घेऊन माणगावमधील एका लॉजवर घेऊन गेला. त्याच वेळी विशाल मोरे व भूषण पतंगे हे लॉजच्या रूमवर आले. विशालने मी पूजाचा भाऊ, तर भूषणने मी पत्रकार आहे असे सांगितले. इतर आरोपींनी व्यापार्‍याला जीवे मारण्याची धमकी दिली व 15 लाखांच्या खंडणीची मागणी केली.

याबाबत व्यापार्‍याने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला व खंडणी मागितल्याप्रकरणी सात आरोपींना अटक केली. फरार असलेली मुख्य आरोपी पूजा व अनोळखी महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply