Breaking News

खोपोलीत पावसाची फटकेबाजी

खोपोली : प्रतिनिधी

गुरुवारपासून पडणार्‍या धुव्वादार पावसाने खोपोलीसह खालापूरला झोडपले पावसाच्या या फटकेबाजीने स्थानिक प्रशासन मात्र क्लीन बोल्ड झालेले पहावयास मिळाले. नॉनस्टॉप पडणार्‍या पावसाने शहराच्या डीसीनगर, शिळफाटा, चिन्मयनगर, खालची खोपेाली, कृष्णानगरसह अनेक भागात पाणीच पाणी झाले. भानवज काजुवाडी टेकडीजवळ असलेल्या कमला रेसीडेन्सी आवारात दरड कोसळली जीवीतहानी झाली नाही, पण परिसरात भीतीचे वातारवरण पसरले.

दरम्यान, मुंबई-पुणे रेल्वे लाईनवरील घाटात जांबरुंग केबीनजवळ मालगाडीचे इंजिन घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वे लाईन ठप्प झाली तर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर चौकजवळ ट्रक पलटी झाल्याने काहीकाळ या रस्त्यावरीलहि वाहतूक मंदावली. बोरघाटात खंडाळा येथे दाट धुक्याचाही जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला या रस्त्यावरील वाहतूक मंदावल्याने वाहतूक कोंडी झाली. शहरातील वेगवेगळया भागातील पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्षा सुमन औसरमल, नगरसेवक मोहन औसरमल, मुख्याधिकारी शेट्ये तसेच स्थानिक नगरसेवकांनी आपापल्या भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला व त्यासंबंधी अधिकार्‍यांना सूचना दिल्या. शुक्रवार सायंकाळीपर्यंत पावसाचा तडाखा सुरु होता.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply