Saturday , March 25 2023
Breaking News

आगीत घर खाक; घातपाताचा संशय

शिवसेना संघटक संतोष भोईर यांची बहीण मुलासह बेपत्ता

खालापूर ः प्रतिनिधी

खालापूर बीड खुर्द गावातील भानुदास हरिचंद्र कर्णुक पाटील यांच्या घराला रात्री दीड वाजता अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. भानुदास रात्री कामावर गेल्याने बचावले, घरात तीन व्यक्ती झोपल्या होत्या. पैकी मुलगी स्नेहा पाटील (वय 19) हिने जळक्या घरातून वरच्या मजल्यावरुन उडी मारल्याने ती बचावली. दरम्यान, या घटनेत बचावलेल्या मुलीला साधे खरचटलेही नाही, शिवाय दोघे बेपत्ता असून जळक्या घरात त्यांचा काहीच अंश न सापडल्याने यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील बेपत्ता व्यक्ती रंजना कर्णुक पाटील ही खालापूर तालुका शिवसेना संघटक संतोष भोईर यांची बहीण आहे.

परंतु मुलगा सुनिल कर्णुक पाटील व रंजना भानुदास कर्णुक पाटील हे मात्र अद्याप बेपत्ता आहेत. गावातील युवक व पुरुष मंडळींनी मदतीला धावून मदतकार्य केले. खोपोली अग्नीशमन दल दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.  घटनेची माहिती मिळताच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेची माहिती घेतली.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply