Thursday , March 23 2023
Breaking News

सीकेटीची मैथिली राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्त

अंधेरी येथे झालेल्या इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धा परीक्षा 2019मध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी मैथिली नारायण फडके हिने सुवर्ण कामगिरी करीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला.

मैथिली इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी असून या स्पर्धा परीक्षेसाठी सीकेटीतील पहिली ते चौथीच्या एकूण 39 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुभाष मानकर, शिक्षिका विजयश्री थळी यांचे मार्गदर्शन लाभले.

  या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव डॉ. नंदकुमार जाधव तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सर्व सदस्यांनी मैथिलीला शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply