Breaking News

काम करणारा नेता निवडा : ना. रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्त

समाजसेवेची आवड असणारे अनेक असतात, पण खर्‍या अर्थाने समाजसेवेत वाहून घेणारे कमी असतात. आपल्या भागातील परिस्थिती पाहून नेते व कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिशा देणे गरजेचे असते. त्यासाठी काम करणारे नेतृत्व निवडा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते पक्षप्रवेश व नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 5) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बांधनवाडीत हॉटेल मोतीमहल येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रवक्ते मिलिंद पाटील, सरचिटणीस अविनाश कोळी, चिटणीस शरद कदम, पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विनोद साबळे, भूपेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

कर्नाळा विभाग गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिला. मुंबई-गोवा महामार्गावरील वनविभागाच्या अखत्यारित येणार्‍या कर्नाळा परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. त्यासाठी 11 कोटींची योजना तयार आहे. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल असे सांगून, उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महेश बालदी तडफेने काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन ना. रवींद्र चव्हाण यांनी केले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात जनतेचे प्रश्न सोडविण्यासह पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याचे सूचित केले; तर पक्षप्रवेश केलेल्यांचा उचित मान-सन्मान राखला जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, साईचे सरपंच विद्याधर मोकल यांचीही समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत, तर नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर यांनी केले. कार्यक्रमास भाजप केळवणे जि. प. अध्यक्ष किरण माळी, दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, भाजप नेते चंद्रकांत पाटील, गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यांनी केला पक्षप्रवेश

कर्नाळा ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी उपसरपंच विद्याधर जोशी, अरुण जोशी, जयेश जोशी, मनीष जोशी, गणेश जोशी, प्रणित जोशी, तेजस जोशी, दयानंद जोशी, दर्शन जोशी, जगदिश जोशी, ज्ञानेश्वर जोशी, अंबाजी जोशी, दिनेश यादव, दीपेश यादव, अंकुश जोशी, रामदास पाटील, दिनेश पाटील, सचिन पाटील, संकेत म्हात्रे, सुमित पाटील, संजोग पाटील, सलमान शेख, गुरुनाथ पवार, शेखर म्हात्रे, राकेश म्हात्रे, प्रमोद पाटील, शशिकांत पाटील, दिनेश बाईत, चंद्रकांत पाटील, सुदर्शन पाटील, सुयोग पाटील, अशोक पवार, रोशन पवार, मयूर, विकास सावा, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे काँग्रेसचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य दत्तात्रेय हातमोडे यांच्यासह समर्थक, शिवसेनेचे युवासेना तालुका उपाध्यक्ष कमलाकर ठोकळ (पळस्पे), बारापाडा येथील फरीद दळवी व सहकारी, तळवलीतील शेकापचे संदेश मालकर व सहकारी, कैरा येथील स्वप्नील पाटील व सहकारी, चावणेतील कृष्णा वाघे व अन्य, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकेश पाटील, माजी उपसरपंच भानुदास माळी (कासप) व समर्थक, सवणेतील भीम पवार व अन्य, कसळखंड ग्रामपंचायतीचे सुरेश लखांबळे (आरिवली) व अन्य, भेंडखळचे माजी उपसरपंच मिलिंद पाटील व समर्थक, सोनारीचे चंद्रकांत कडू, हिरामण कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे खाने आंबिवलीतील मंदार गोपाळे व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, स्वप्नील पाटील आदींनी समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागतकेले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply