Breaking News

कबड्डीपटू नीता धुमाळ यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी

 रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या माजी व्यवस्थापिका नीता दिलीप धुमाळ यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधान झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व सून असा परिवार आहे. 

नीता धुमाळ रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खानाव केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापिका म्हणून पाच वेळा जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे पती दिलीप धुमाळ हे माजी राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत. नीता धुमाळ यांच्यावर दिवलांग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply