Tuesday , March 21 2023
Breaking News

उरण महाविद्यालयात वृक्षारोपण

उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम झाला. एकच लक्ष तेहतीस कोटी वृक्ष, या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा भाग म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) स्वातंत्र्य सैनिक दत्ता रहाळकर खेळाचे मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात उरणच्या नगराध्यक्षा  सायली म्हात्रे व महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा  यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी  प्राध्यापक व्ही. एस. इंदुलकर तसेच प्रा. एच. के. जगताप, प्रा. रामकृष्ण ठवरे,  प्रा. डॉ. पराग कारुळकर, प्रा. आनंद गायकवाड, प्रा. एम. जी. लाणे, प्रा. डॉ. अरुण चव्हाण तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे, प्रा.  अनुपमा कांबळे, प्रा. लिटन कुमारी यांनी मेहनत घेतली.

रोजगार उद्योजकता मार्गदर्शन

अलिबाग ः कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यांच्यामार्फत सन 2015पासून सुरू करण्यात आलेल्या जागतिक युवा कौशल्यनिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयामार्फत सोमवारी (दि. 15) पनवेल येथे रोजगार-उद्योजकता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औद्यागिक प्रशिक्षण, मुंबई-पुणे हायवे,एस टी स्टॅण्डजवळ, पनवेल येथे सोमवारी सकाळी 11 वा. युवक व युवतींनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक संचालक शा. गि. पवार यांनी केले आहे.

चिरनेर ते वहाळ पदयात्रेचे आयोजन

उरण ः उरण तालुक्यातील साई सेवा मंडळ चिरनेर यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त चिरनेर परिसरातील साई भक्तांच्या चिरनेर ते वहाळ साई पालखी दिंडी पदयात्रेचे मंगळवारी (दि. 16) दुपारी 12 वाजता चिरनेर येथील महागणपती मंदिरात श्रींची महाआरती करून गव्हाणफाटा मार्गावरील साई मंदिर वहाळ येथे प्रस्थान होणार आहे. या साई पालखी, दिंडी पदयात्रेमध्ये चिरनेर परिसरातील भाविकांनी सहभागी संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साई सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित मुंबईकर यांनी केले आहे. उपाध्यक्ष नितीन नारंगीकर,सचिव संतोष चिर्लेकर, खजिनदार प्रसाद पाटील, सल्लागार गजानन म्हात्रे, बबन ठाकूर, हरिश्चंद्र मोकल व रमेश म्हात्रे यांच्यासह साई सेवा मंडळाचे सदस्य दिंडीच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत.

रोटरी क्लब अध्यक्षपदी सुनील लघाटे

पनवेल ः रोटरी क्लब ऑफ पनवेलचा पदग्रहण समारंभ पनवेल जिमखाना 52 बंगला सोसायटी येथे नुकताच पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीडीजी डॉ. शैलेश पालेकर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष संतोष आंबवणे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल लघाटे यांना कॉलर प्रदान केली. मावळते सेक्रेटरी किरण परमार यांनी नवीन सेक्रेटरी गणेश साठे यांना कॉलर प्रदान केली. डॉ. अरविंद दांडेकर यांना गौरिवण्यात आले. तसेच डॉ. अनिल खोत यांनी वैद्यकीय व्यवसायातील 50 वर्षे  पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पीडीजी डॉ. दीपक पुरोहित, डॉ. दीपक कुलकर्णी, डॉ. सुहास हळदीपूरकर, राजाभाऊ गुप्ते, वसंत गद्रे, अमर म्हात्रे, अ‍ॅड. अमेय सावळेकर व क्लबचे सभासद व अन्य उपस्थित होते.

भांडणातून महिलेची आत्महत्या

पनवेल ः पतीसोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नवीन पनवेलमध्ये घडली. शारदादेवी ताराप्रसाद अधिकारी (40) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेतील मृत शारदादेवी ही नवीन पनवेल सेक्टर-3मधील वीमा सोसायटीत कुटुंबीयांसोबत रहाण्यास होती. शारदादेवी आणि तीचा पती या दोघांना दारुचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होते. त्यामुळे शारदादेवी हिने रागाच्या भरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तीच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

वैद्यकीय तपासणी शिबिर

पनवेल ः पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुधवारी (दि. 17) मोफत वैद्यकीय तपासणी तसेच मोफत औषधवाटप व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन प. पू. मठाधिपती रायगड भूषण सुधाकरभाऊ लक्ष्मण घरत यांनी केले आहे. या निमित्ताने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महात्मा ज्योतीबा फुले जनआधार योजनेंतर्गत श्री स्वामी समर्थ मठ गावदेवीपाडा पनवेल व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. यासाठी तेथे येणार्‍या रुग्णांनी आपले रेशनकार्ड व ओळखपत्र तसेच आजार संबंधीचे जुने रिपोर्ट येताना बरोबर घेऊन यावेेत. त्याचप्रमाणे सायंकाळी 7 ते 10 या दरम्यान आगरी समाज हॉल पनवेल येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन अवधूत सुधाकर घरत यांनी केले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यावाटप

उरण ः शिवसेना ग्राहक संरक्षणतर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आदिवासी वाड्यावरील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून वह्यावाटप करण्यात आले. या वेळी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, कक्ष जिल्हाप्रमु्ख रमेश म्हात्रे, कक्ष महानगरप्रमुख किरण तावजरे, महिला उपजिल्हा संघटक ममता पाटील, भा. वि. सेना जिल्हासंघटक रोहिदास पाटील, शिक्षकसेनेचे कौशिक ठाकुर, तालुका संघटक सुजाता गायकवाड, रंजना ताडेल, शहर संघटक विणा तरलेजा, मेघा मेस्त्री, वंदना पवार, गोवढणे सरपंच प्रणिता म्हात्रे, सोनारी शाखाप्रमुख नारायण तांडेल, तालुका कार्यालयप्रमुख गजानन माळी, कक्ष उपतालुकाप्रमुख संजय म्हात्रे, उपशहरप्रमुख पंकज सुतार, केशव यादव, उपकक्षप्रमुख शशांक ठाकूर, भीमराव ठाकूर, संदीप जाधव उपस्थित होते.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply