Breaking News

विमान हायजॅक करण्याची धमकी; विमानतळांवर अलर्ट

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये फोन करून विमान हायजॅक करण्याची धमकी शनिवारी (दि. 23) देण्यात आली. फोन करणार्‍या व्यक्तीने सांगितले की, ‘एक विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल.’ दरम्यान, या घटनेनंतर देशातील सर्व विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांची सुरक्षा व्यवस्था आधीच वाढविण्यात आली होती. एअर इंडियाच्या सेंटरमध्ये आलेल्या धमकीच्या फोनमुळे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply