








नवीन पनवेल ः पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सहसचिव व विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, शिक्षण विभागाचे साहिल वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, अजय बहिरा, नगरसेविका सुशिला घरत, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, भाजपचे राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, संतोष भोईर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या शितला गावंड, श्री. बावडे, जयराम मुंबईकर, कामोठे विद्यालयाच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे आदी उपस्थित होते.