पनवेल : रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मायबोली एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा आणि महापालिका क्षेत्र मर्यादित आंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय मायबोली एकपात्री व द्विपात्री स्पर्धा मराठी भाषेकरिता; तर आंतरभारती एकपात्री स्पर्धा इतर भाषांकरिता असून, 16 वर्षांपासून पुढील स्पर्धकांसाठी असणार आहे. राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास दोन हजार, द्वितीय 1500, तृतीय एक हजार, उत्तेजनार्थ दोन पारितोषिके, द्विपात्री स्पर्धेतील प्रथम क्रमांकास तीन हजार, द्वितीय दोन हजार, तृतीय क्रमांकास एक हजार रुपये, उत्तेजनार्थ दोन पारितोषिके, आंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये, उत्तेजनार्थ दोन पारितोषिके, तसेच तिन्ही गटांतील विजेत्यांना चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑडिशनचे व्हिडीओ 7757000000 या क्रमांकावर 25 जुलैपर्यंत natyaparishad.panvelgmail.com या ई-मेलवर पाठविता येणार आहेत. अधिक माहितीसाठी अमोल खेर (9820233349) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा. प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.