आमदार प्रशांत ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात प्रचंड प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरसाठी योग्य असे क्षेत्र निवडावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रविवारी (दि. 14) विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी कामोठे येथील ज्ञानसाधना केंद्रातील सभागृहात करण्यात आले होते. या सोहळ्याला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास आरपीआयचे कोकण अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश गायकवाड, प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, निलेश बावीस्कर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, भाजप युवा मोर्चा पनवेल महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, ज्येष्ठ नेते रवींद्र जोशी, वाहतूक मोर्चा अध्यक्ष एकनाथ कुंभार, प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे, कामोठे शहर उपाध्यक्ष अमोल सैद, रावसाहेब बुधे, भास्कर दांडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस रोहित घाडगे, प्रदीप भगत, वनिता पाटील, जयश्री धापते, फातिमा आलम, ज्योती रायबोले, जयकुमार डिगोळे, युवा मोर्चा प्रभाग 11अध्यक्ष अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे नेटके आयोजन कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि युवा नेते हॅप्पी सिंग यांनी केले होते.
ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांनी भविष्यातही पालक, शिक्षक, शाळा, संस्था व समाजाप्रति कृतज्ञ राहून पुढील पायरी चढावी, तसेच जीवनात स्थिरस्थावर झाल्यानंतर चार पावले पुढे येऊन असाच उपक्रम नवोदितांसाठी आयोजित करावा, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.