पनवेल : बातमीदार
शहाबाज बेलापूर गटाच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना बालवाडी ते सातवीपर्यंतच्या मुलांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल, खाऊ, तसेच पाट्या वाटपाचा उपक्रम पनवेल तालुक्यातील कळंबोली तर्फे तळोजा येथील ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये करण्यात आले.
या वेळी वैश्य समाज संघ, शहाबाज बेलापूर गटाचे गट सभापती ओंकार दिलीप गंधे, शिक्षण समिती सदस्य प्रसाद वडे, शिक्षण समिती सदस्या प्राची वडे, आरोग्य समितीच्या सुप्रिया भरणुके, निराधार पुरुष समितीचे सदस्य स्वप्नील भरणुके, निराधार महिला समितीच्या सदस्या आराध्या अमोल भरणुके, तसेच समाज बांधव दिप्ती गंधे, वैष्णवी भरणुके, अमोल भरणुके, आशिष भरणुके, दिलीप गंधे, आशिष आंबवणे, रूपाली आंबवणे आदी समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी गट सभापती यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.