Breaking News

मिनीट्रेनच्या इंजिनात बिघाड

कर्जत : बातमीदार

माथेरान-अमन लॉज शटलसेवा गुरुवारी (दि. 18) इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांचे हाल झाले.

प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानची लाइफलाइन मिनीट्रेनची सेवा नेरळ-माथेरानदरम्यान पावसाळ्यात बंद असते. या काळात स्थानिकांसह पर्यटकांसाठी माथेरान-अमन लॉज शटलसेवा दररोज सुरू असते. गुरुवारी ही शटलसेवा नवीन इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळच्या पहिल्या फेरीपासूनच रद्द करण्यात आल्याने पर्यटकांची गैरसोय झाली.

दुपारी दोनच्या सुमारास नेरळवरून आलेल्या मालगाडीचे इंजीन जोडून माथेरान ते अमन लॉजदरम्यान पहिली शटल फेरी रवाना करण्यात आली. बिघाड झालेल्या एनडीएम 1405 या इंजीनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply