Breaking News

गुड न्यूज! 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस; 60 वर्षांवरील सर्वांना ’बूस्टर’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने आणखी पावले उचलली आहेत. आता देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, मुले सुरक्षित तर देश सुरक्षित. मला सांगायला आनंद होतोय की, 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्याचबरोबर 60 वर्षांवरील सर्व नागरिक आता प्रिकॉशनरी डोस घेऊ शकतील. त्यामुळे माझे मुलांना आणि 60 वर्षांवरील नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी लस जरूर घ्यावी. देशात 3 जानेवारी 2022पासून देशात प्रथमच 18 वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा उघडणे सोपे झाले. आता 12 वर्षांच्या मुलांचेही लसीकरण करून लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कॉर्बोव्हॅक्स लस दिली जाणार आहे. देशातील 18 वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी कोरोनावरील लस असेल.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवानिमित्त रामपर्व सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply