Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात 85 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदानप्रक्रिया झाली. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. जवळपास 85 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. 25) मतमोजणी आहे. सरपंचपदासाठी 226; तर सदस्यपदासाठी एक हजार 631 असे एकूण एक हजार 857 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानप्रक्रियेला सुरुवात झाली. रविवार असल्याने काही ठिकाणी सकाळी संथगती होती, पण दुपारनंतर मतदानाला लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. दुपारी 3.30 वाजपर्यंत जिल्ह्यात 69 टक्के मतदान झाले होते. उमेदवार, कार्यकर्ते हे वृद्ध, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले. मतदानासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस सज्ज होते. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील वाटणार्‍या ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर होती. किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 25 फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर मतमोजणी होईल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply