Breaking News

गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर : नितीन गडकरी

वर्धा : येथे रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी ते पुरविले जाईल, पण वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाइफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. येथे दररोज 30 हजार व्हायल्सची निर्मिती होणार आहे. या कंपनीतील उत्पादनाची पाहणी करण्याकरिता नितीन गडकरी वर्ध्यात आले होते. या वेळी त्यांनी उत्पादनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Check Also

स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …

Leave a Reply