Breaking News

जांभूळपाडा महापुराला 30 वर्षे

ग्रामस्थांची मृतांना श्रद्धांजली

सुधागड-पाली ः रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा अंबा नदीला दि. 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला. या महापुराला मंगळवारी (दि. 23) 30 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील स्मृतिस्तंभाजवळ सर्व नागरिक व मान्यवरांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या महापुरात अनेकांनी आपली बायको,  मुले, भाऊ, बहिणी, भाचा अशी जिव्हाळ्याची माणसे गमावली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याबाबत माहिती देताना डॉ. अनंत दांडेकर म्हणाले की, 23 जुलै 1989ची रात्र जांभूळपाडा गावाच्या दृष्टीने काळरात्र ठरली. सगळीकडे सुन्न आणि भयावह वातावरण होते. दुर्दैवाचे दशावतार आणि आभाळ फाटणे काय असते याचा खराखुरा प्रत्यय या पुराने आम्हाला दिला, असे दांडेकर यांनी सांगितले. या वेळी सरपंच श्रद्धा कानडे यांनी सर्वप्रथम श्रद्धांजली वहिली. या वेळी उपसरपंच राजेश शिंगाडे, सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, माजी सभापती भारती शेळके, भास्कर शेळके, माजी सरपंच मिलिंद बहाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जोरकर, जे. बी. पाटील, हरिचंद्र पाटील, डॉ. दांडेकर, गणेश शिंदे, अतिष खंडागळे, रवींद्र खंडागळे, मिलिंद शिंदे आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply