पनवेलमध्ये पर्यावरणपूरक कागदाच्या गणेशमूर्ती

पनवेल ः बातमीदार

गणेशोत्सवाला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होत असून गणेशमूर्ती बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वर्षी शाडूच्या मूर्तीबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. या पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचा दावा मूर्तिकारांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन, प्लॅस्टिक बंदीसारखे अभियान राबविले जात आहेत. त्यामुळेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीपेक्षा शाडूच्या मूर्तीची मागणी भक्तांकडून वाढली आहे. याशिवाय बाप्पाच्या सजावटीतही इकोफ्रेंडली साहित्याचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे या वर्षी शाडूबरोबर कागदी मूर्तीही आल्या आहेत. वाशी सेक्टर 9मधील कन्नडभवन येथे श्री सदगुरू कृपा आर्टचे पंकज घोडेकर आणि रूपेश फुलसुंदर यांनी या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. या मूर्तींची होत असलेली मागणी पाहता आम्ही या पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध केल्या आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी आणल्या असून शाडूच्या व कागदापासून बनविलेल्या मूर्ती मोठ्या प्रमाणात मागविल्या आहेत. एक ते दोन फुटांपर्यंत या मूर्ती असल्याचे रूपेश फुलसुंदर यांनी सांगितले. वर्तमानपत्राच्या कागदांचा लगदा तयार करून मूर्ती तयार केली जाते. या मूर्ती पेणमध्ये तयार केल्या जात आहेत. सध्या नागरिकांमध्ये मूर्तीला अतिरिक्त सजावटीची मागणी असते. तयार मूर्तीवर विविध रंगरंगोटी असली तरी, मूर्ती अधिक आकर्षक, रेखीव दिसावी, याकरिता गणेशभक्त आकर्षक आभूषण दिसण्यासाठी ‘डायमंड वर्क’ची मागणी करतात, परंतु या मूर्तीनाही आकर्षक रंगसंगतीने सजावट केलेली आहे. मात्र अतिरिक्त डायमंड लावणे टाळले आहे. ही मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने ती पर्यावरणपूरकच ठरली पाहिजे, यामुळे त्यांना डायमंड लावले नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

 किमतीत 10 टक्क्यांनी वाढ

रंग, शाडू मातीचे दर, तसेच दळणवळण खर्च वाढल्याने यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या एक ते दोन फुटांपर्यंतच्या मूर्तींना दोन ते चार हजार रुपये, तर शाडूच्या मूर्तींना तीन ते सहा हजार रुपये आणि कागदापासून बनवलेल्या मूर्तींना अडीच ते पाच हजार रुपये दर आहेत. पाण्यात लवकर विरघळतात. वजनही कमी, शाडू, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत या मूर्तीचे दर आवाक्यात आहेत, तसेच कागदापासून बनवलेल्या मूर्ती या वजनाने हलक्या आहेत. शाडूच्या मूर्तीचे वजन 20 ते 25 किलो तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या 10 ते 12 किलो असते, मात्र कागदी मूर्तीचे वजन अवघे पाच किलो असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळतात.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply