Breaking News

कोरोनामुळे निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ‘टीआयपीएल’कडून आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा. लि. अर्थात टीआयपीएल कंपनीच्या वतीने कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला. याद्वारे टीआयपीएल कंपनीने एक आदर्श पायंडा पाडला आहे.
टीआयपीएलमध्ये सुपरवायझर या पदावर काम करणारे विशाल तुकाराम घरत, संजय धर्माजी म्हात्रे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मृत कामगारांच्या कुटुंबाला देण्यात आला. या वेळी टीआयपीएलचे संचालक धनंजय करतुरी, एचआर मॅनेजर शशिकांत मुंबईकर, आयटी मॅनेजर संदीप आंग्रे, अ‍ॅडमिन मॅनेजर सतिश उगले, एचआर असिस्टंट मॅनेजर रवींद्र म्हात्रे आदी उपस्थित होते.
कामगार हा कंपनी कुटुंबातील भाग असल्याने टीआयपीएलने कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, विमा अशी भरपाई देण्याबरोबरच स्वतःहून कंपनीच्या वतीने प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. पुढेही कामगारांच्या कुटुंबाच्या पाठीशी कंपनी उभी राहील, असे या वेळी आश्वासित करण्यात आले. कोरोना काळात टीआयपीएलने मृत कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून इतर कंपन्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply