Breaking News

खोपोली रेल्वेस्थानक मार्गावर खड्डे व पाणीच पाणी

खोपोली : प्रतिनिधीखोपोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. येथील रेल्वेस्थानक रोडवर मोठमोठे खड्डे व मोठ्या प्रमाणात  पाणी साचत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या पूर्वी डागडुजी म्हणून नगरपालिकेकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र मागील चार पाच दिवसातील मुसळधार पावसामुळे येथे टाकलेली खडी व कच पूर्ण वाहून गेली आहेत. सद्यस्थितीत या रस्त्यावर पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यात पावसाची पाणी साचत असल्याने येथून जातांना प्रवासी व नागरिकांची तारांबळ उडत आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply