Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार

भोसले, पिचड, नाईक, कोळंबकरांचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड; तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी (दि. 30) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले सातार्‍यातील जावळी मतदारसंघाचे, वैभव पिचड अहमदनगरमधील अकोला मतदारसंघाचे, संदीप नाईक नवी मुंबईतील ऐरोलीचे; तर कालिदास कोळंबकर मुंबईतील वडाळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या चारही नेत्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील आणि देशातील परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच शहराचा विकास शक्य असल्याची धारणा नवी मुंबईतील नागरिकांची आणि आपल्या कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळेच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत.
-संदीप नाईक

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत येईल असे वाटत नाही आणि तसे झाल्यास जनतेची कामे कशी करायची? मतदारसंघातील लोकांची कामे व्हावीत याचसाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहोत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला हा निर्णय घेणे भागच होते.
-शिवेंद्रसिंहराजे भोसले

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply