खोपोली : जागेच्या जुन्या वादातून कासिम करजीकर (60, रा. हाळखुर्द) यांना मारहाण केल्याची घटना हाळ खुर्द गावात घडली असून, या प्रकरणी नऊ जणांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तबेल्याच्या जागेवरून कासिम यांचा जुना वाद सुरू आहे. अनेकदा भांडणेही झाली आहेत. रविवारी हा वाद पुन्हा उफाळला. कासिम हाळ फाटा येथे उभे असताना कासिम मेटकर, अफजल मेटकर, फजल मेटकर, रिजवान मेटकर, मुस्तफा जळगावकर, मन्सुर अब्दुल रहेमान जळगावकर, आकसा मेटकर, रूखसाना मेटकर, शेख हसन मेटकर व लतिफा मेटकर यांनी शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याची तक्रार कासिम यांनी दिली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …