Breaking News

भाजप सदस्यांना स्मार्ट कार्डचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपच्या वतीने देशभरात सदस्य नोंदणी अभियान उत्साहात सुरू आहे. या अभियानांतर्गत ज्यांनी नव्याने सदस्य नोंदणी केले आहे त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड बनवून देण्यात आले आहेत. या काडर्र्चे वाटप भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8) करण्यात आले. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, लीना पाटील, श्वेता खैरे, समिना साठी, प्रियंका पवार, सुलोचना कल्याणकर, प्रतिभा ठाकूर, प्रतिभा भोईर, दुर्गा सहानी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply