Breaking News

जेबीएसपी @ 25

रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला (जेबीएसपी) 25 वर्षे झाल्याने या संस्थेचा दोनदिवसीय रौप्य महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी शुक्रवारी

(दि. 9) खांदा कॉलनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सीकेटी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव डॉ. नंदकुमार जाधव, माजी जि. प. सदस्य संजय पाटील, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील हेही उपस्थित होते. (पान 2 वर..)

वाय. टी. देशमुख यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त 13 व 14 ऑगस्ट असे दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 13 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता होणार्‍या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलपती प्रो. डॉ. सुहास पेडणेकर, महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. नरेश चंद्रा, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार असून, हा समारंभ संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पाटील, अनिल भगत, संजय भगत, वर्षा ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संजय भोपी, मनोहर म्हात्रे, नगरसेविका कुसुम पाटील, सीता पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता होणार्‍या सोहळ्यास राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत. या वेळी मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक भास्करराव बाबर, शिक्षण आयुक्त कार्यालय सहसंचालक राजेंद्र गोधणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त दत्तात्रय जगताप यांची प्रमुख उपस्थिती; तर विशेष अतिथी म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, वृषाली वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. एस. टी. गडदे यांनी दिली.

13 ऑगस्टला होणार्‍या सोहळ्यात महाविद्यालयातून 25 वर्षांच्या कालावधीत उच्च शिक्षण घेऊन भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही डॉ. गडदे यांनी सांगितले; तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विभागात 22 प्रकारच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना 14 ऑगस्टला होणार्‍या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार असल्याचे डॉ. नंदकुमार जाधव यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply