Breaking News

पनवेलमधील पूरबाधित गावांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील डोलघर, आपटा, दिघाटी, केळवणे व चिरनेर येथे मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला पूर आल्याने पाणी शिरले होते, तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पनवेलचे आमदार तथा भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश शेठ बालदी यांनी प्रशासनातील सर्कल, तलाठी व पोलीस प्रशासन यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
डोलघर, आपटा, दिघाटी, केळवणे व चिरनेर येथील ज्यांची घर पाण्याखाली गेली होती त्यांना आर्थिक भरपाई संधर्भात रायगड कलेक्टर व पनवेलचे तहसीलदार यांच्याशी दोन्ही आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी चर्चा करून जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.डोंगरालगत असलेल्या लोकांचे तात्पुरते स्थलांतर व कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासनही आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी दिले.
या वेळी केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कर्नाळा विभाग अध्यक्ष बाळूशेठ पाटील, केळवणे पंचायत समिती विभाग अध्यक्ष हिरामण ठाकूर, गणेश पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, कर्नाळा ग्रामपंचायत माजी सरपंच राजेंद्र पाटील, सदस्य प्रफुल्ल पाटील, सदस्य विनोद पवार, शिरढोण माजी उपसरपंच विजय भोपी, भाजप युवा नेते अनिल टकले, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, माजी उपसरपंच दत्ताशेठ पाटील,छोटू जुमलेदार, कमलाकर टाकले, कैलास पाटील, विकास पाटील, रोशन पाटील, जितेंद्र पाटील, हर्षल तेजे व डोलघर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply