Breaking News

नगरसेविका सुशीला घरत यांची सामाजिक बांधिलकी

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, तसेच प्रियदर्शनी महिला मंडळ, जिव्हाळा ग्रुप व नगरसेविका सुशीला घरत यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मंगळवारी (दि. 13) मदत रवाना केली.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेलमधील अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, तसेच प्रियदर्शनी महिला मंडळ, जिव्हाळा ग्रुप व नगरसेविका सुशीला घरत यांच्यामार्फत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी  धान्य तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, गहू, साखर, टूथपेस्ट, साबण, बिस्किटे व कपडे हे साहित्य घेऊन भिलावाडी येथे ट्रक पाठवण्यात आले. मदत गोळा करण्यासाठी प्रशांत आवळे, संदीप नारायण पाटील,  संदीप बाळाराम पाटील, राजू बोराडे, प्रवीण चव्हाण, गौरी पवार, शारदा माने, शोभा पन्हाळे, लक्ष्मी चव्हाण, सदाशिव काशीद, अमित पाटील, प्रफुल्ल पवार, रजपूत व प्रभाग 17चे अध्यक्ष विजय म्हात्रे, मनोज बिले व इतर मंडळाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply