Breaking News

खानाव, महाळुंगीतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून लोककल्याणकारी योजना राबवत मोदी सरकारने देशाला, तर फडणवीस सरकारने राज्याला विकासाची दिशा दिली आहे, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 19) येथे केले.

पनवेल तालुक्यातील खानाव व महाळुंगी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते.

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात  झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, चिंध्रणच्या सरपंच कमला देशेकर, शशिकांत दिसले, कानपोलीचे सरपंच कैलास पाटील, अरुण पाटील, रवींद्र पाटील, तुषार दुर्गे, दीपक तवले, बाळाराम पाटील, पिंटू म्हात्रे, एकनाथ फराड, सचिन दिसले, द्वारकानाथ बोराडे, तुळशीराम तातरे, बाबूराव कर्णूक, अनंता पाटील, बबन जाधव, प्रकाश जाधव, पुंडलिक तवले आदी उपस्थित होते.

या वेळी खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणू जैतू मुंढे, लहू देऊ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप खंडू पाटील, माजी पोलीस पाटील राम देऊ पाटील, अंकुश देऊ पाटील, विठ्ठल पाटील, टिळक नारायण पाटील, विलास नारायण पाटील, नामदेव शंकर पाटील, भालचंद्र नारायण पाटील, सचिन गणू मुंढे, बाळाराम सदू शेळके, राजू हिरामण पाटील, गुरुनाथ राम पाटील, तसेच महाळुंगी वाडी येथील दिलीप महादू वाघे, बबन रघुनाथ नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य काळू धर्मा वाघे, विलास सीताराम गोंधळी, गणेश शनिवार वाघे, नरेश राम नाईक, बाळू काळू वाघे, विनोद मंगल वाघे, हितेश राम नाईक, नवनाथ काशिनाथ पवार, सोपान दिलीप वाघे यांनी समर्थकांसह भाजपत प्रवेश

केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांना अपेक्षित विकास काँग्रेस सरकार करू शकले नाही. त्यामुळे आपला देश मागे पडला होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हाती घेतल्यानंतर आपला भारत जगात सर्वात वेगवान प्रगती करणारा देश म्हणून पुढे आला आहे. तळागाळातील घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा उद्देश भाजप सरकारने ठेवल्यानेच देशाच्या प्रगतीत भर पडली आहे. भाजप नुसता शब्द देत नाही, तर बोलतो ते करून दाखवतो, असेही त्यांनी नमूद केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply