Breaking News

उत्साह, थरार अन् जल्लोष! गोपाळकाल्याचा सण रायगडात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

गोपाळकाल्याचा सण शनिवारी

(दि. 24) रायगड जिल्ह्यात साजरा करण्यात आला. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे काही दहीहंड्या रद्द झाल्या असल्या, तरी उर्वरित आयोजकांनी परंपरा जपत उत्सव साजरा केला. या वेळी गोविंदांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. थरांवर थर लावून सलामी देत हंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वांनी एकच जल्लोष केला.

रायगड जिल्ह्यात यंदा नवीन पनवेल पोदी येथील साईतेज प्रतिष्ठानचा आमदार चषक दहीहंडी उत्सव आकर्षण ठरला. महापालिका प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी आयोजिलेल्या या दहीहंडी उत्सवास सिनेअभिनेता अंकुश चौधरी याची प्रमुख उपस्थिती लाभली, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही उपस्थिती दर्शविली. त्याचप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अ‍ॅड. मनोज भुजबळ, जगदिश गायकवाड, नितीन पाटील, अमर पाटील, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, विद्या गायकवाड, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वागत न स्वीकारता पारंपरिक सणाला मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व गोविंदांचे आयोजकांच्या वतीने आभार मानले; तर आयोजक तेजस कांडपिळे दहीहंडीतील काही रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याने अभिनेता अंकुश चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply