Breaking News

झुंजार शतकी ‘स्टोक्स’

हेडिंग्ले : वृत्तसंस्था

अ‍ॅशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे दोन फलंदाज 15 धावांत माघारी परतले असताना बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना एक विकेट्सने जिंकला.  या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला मोठी आघाडी घेण्याची संधी होती, पण जोश हेझलवूड (5/30), पॅट कमिन्स (3/23) आणि जेम्स पॅटिन्सन (2/9) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही, परंतु मार्नस लॅबुशचॅग्ने (80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंडसाठी रुट व डेन्ली यांनी इंग्लंडचा डाव सावरला. रुटने 205 चेंडूंत 77, तर डेन्लीने 155 चेंडूंत 50 धावा केल्या, पण ते माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा गडगडला. त्यानंतर बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी संघर्ष केला, पण हेझलवूडने बेअरस्टोला माघारी पाठवले, मात्र स्टोक्सने अखेरपर्यंत खिंड लढवत संघाला मिळवून दिला.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply