Breaking News

सर्वाधिक मताधिक्याची वाशी विभागाकडून अपेक्षा -रविशेठ पाटील

पेण ः प्रतिनिधी

वाशी विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या श्रीकांत पाटील यांच्या वाशी येथील निवासस्थानीे संपन्न झालेल्या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. याव्यतिरिक्त व्ही. बी. सर व विकास म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात आपण आपला हक्काचा आमदार विधानसभेत पाठवू या, असे मत मांडले. रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, लोकसभेला जी आघाडी आपल्याला या गावाने, विभागाने दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. वाशी हा मला मानणारा, माझ्यावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. या वेळी गोरख पाटील, रूपेश पाटील, परशुराम पाटील, नंदकिशोर म्हात्रे, अशोक पाटील, जयकिसान वर्तक, ओमकार म्हात्रे, रविकांत म्हात्रे, मितेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, कुणाल पाटील यांसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply