Breaking News

तिहेरी तलाकच्या पाठिंब्यासाठी मराठमोळ्या महिलेचा बुरखा घालून प्रचार

पनवेल ः वार्ताहर

नुकताच केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा मंजूर केल्याने मुस्लीम महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला. हा कायदा खरोखरच मुस्लीम भगिनींसाठी फायद्याचा असून त्या कायद्याची प्रसिद्धी व्हावी व केंद्र सरकारचे अभिनंदन करावे, त्या कायद्याला पाठिंबा द्यावा, या उद्देशाने पनवेलमधील उद्योजिका मनीषा म्हात्रे या स्वतः बुरखा परिधान करून त्याचप्रमाणे अंगात लाईफ जॅकेट व डोक्यात हेल्मेट घालून या कायद्याला पाठिंबा देण्याची पत्रके पनवेल रेल्वेस्थानक परिसरात वाटत आहेत.

कुठल्या आई-बापाला आपल्या मुलीचा तलाक झालेला आवडेल, असा सवाल मनीषा म्हात्रे यांनी विचारला. केवळ तोंड उघडून छोट्या-छोट्या कारणावरून तीन वेळा तलाक म्हटल्याने एक नवरा जर आपल्या पत्नीला तलाक देेत असेल, तर मुस्लीम भगिनी आज बिलकूल सुरक्षित नाहीत. अनेक मुस्लीम भगिनी तलाकच्या भीतीपोटी जगत आहेत. काहींना तर हलालसारख्या वाईट रुढी परंपरांना सामोरे जावे लागत आहे, परंतु केंद्र सरकारने हा कायदा मंजूर करून या महिलांचा आत्मविश्वास वाढविला आहे. तिहेरी तलाक कायदा मुस्लीम भगिनींसाठी सुरक्षा कवच घेऊन आला आहे. म्हणून या सरकारचे मी अभिनंदन करते व त्यांना पाठिंबा देते, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे मुस्लीम महिलांसह इतर समाजबांधवांनी कौतुक केले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply