Breaking News

नवनीत राणा आक्रमक

अरविंद सावंतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणार्‍या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संसदेत सचिन वाझे प्रकरण उचलून धरल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिली. महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुलाही तुरुंगात डांबू, अशी धमकी सावंत यांनी दिल्याचे नवनीत राणा यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबईतील मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी आपण लोकसभेत प्रश्न उपस्थित केले. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये धमकावले. यापूर्वीही आपल्याला शिवसेनेच्या लेटरहेडवरून आणि फोनवरून अ‍ॅसिड हल्ल्यासह जिवे मारण्याची धमकावण्यात आले आहे, असे राणा यांनी पत्रात म्हटले आहे, तसेच या प्रकरणी पोलीस कारवाईची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply