पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील विचुंबे, उलवे, करंजाडे नोड, सुकापूर, आकुर्ली, उसर्लीखुर्द या सहा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने येथील इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंन्टेमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आल्या आहे.
यामध्ये विचुंबे येथील सर्व्हे नं.143/1, विचुंबे येथील गंगा रेजिन्सी को.ऑ.हौ.सोसायटी, उलवे येथील प्लॉट नंबर 70, सेक्टर 5, उलवे येथील मोरेश्वर को.ऑ.हौ.सो., बी विंग, करंजाडे नोड येथील प्लॉट नं.22 बी, सेक्टर 1, करंजाडे येथील प्लॉट नं.83, सेक्टर आर 1, सुकापूर येथील बालाजी लाईफस्टाईल गृहनिर्माण संस्था, ए विंग ही इमारत, आकुर्ली येथील पनवेल पॅराडाईस, आकुर्ली गृहनिर्माण संस्था (डी विंग) उलवे येथील सेक्टर 8, उलवे येथील डेल्टा टॉवर, (ए.बी.सी.डी.ई. विंग) ही संपूर्ण इमारत व डेल्टा टॉवर 2 (अंडर कंन्स्ट्रक्शन), उसर्लीखुर्द येथील दिप सिटी को.ऑ.हौ.सो. (बिल्डींग नं.7) या संपूर्ण इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंन्टेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.