Breaking News

कामोठ्यात वाचनालयाच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नगरसेविका संतोषी तुपे यांच्या नगरसेवक निधीच्या माध्यामतून कामोठे येथे वाचनालयाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. 13) भूमिपूजन करण्यात आले. या कामाच्या भूमिपूजनावेळी वेळी नगरसेविका कुसुम म्हात्रे, भाजपचे प्रभाग क्रमांक 11चे अध्यक्ष रमेश तुपे, श्रीकांत नलावडे, गणेश मांगुळेकर, रोहन अहिलवे, बुथ अध्यक्ष नारायण सोनावणे, विष्णू जयगरणी, ललिता इनकर, सिया साबेळे, वैशाली साबळे, उषा रजिवडे, वैशाली आरुणे, सुषमा सोनावने, छाया दडस यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी आपले मनोगतव्यक्त केले.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply