Breaking News

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा -मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी

लोकशाहीच्या उत्सवात महाराष्ट्रातील प्रत्येक बंधू- भगिनीने सहभागी व्हावे. आपले मत ही विकास प्रक्रियेतील फार मोठी शक्ती आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जनतेला आवाहन केले आहे. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला, तसेच भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याचेही स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट केले. ‘लोकशाहीतील सर्वांत मोठ्या महोत्सवाचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे आणि ते अमूल्य आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply