Breaking News

जय भवानी मित्र मंडळातर्फे स्वच्छतेचा जागर

अलिबाग ़: प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंतीनिमित्त अलिबाग गोंधळपाडा येथील जय भवानी मित्र मंडळातर्फे बुधवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.गोंधळपाडा येथील समाजमंदिर येथे मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. गोंधळपाडा समाजमंदिर, अंगणवाडी, व्यायामशाळा, गावदेवी मंदिर, शाळा परिसर, मुख्य रस्ते, सार्वजनिक विहिरी आदी भागातील प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. तो एकत्र करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष मनोज पडियार, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सतीश पुजारी, नरेश परियार, गणेश गावडे आदींच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत मोठ्या संख्येने सदस्य व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply