Breaking News

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा

अलिबाग ः रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) येथे केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहामध्ये आयोजित शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार विनय नातू, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या सद्य स्थितीबाबत सादरीकरण केले.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेसह विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभवाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या लाभार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदार कार्डचे आधार लिंक करण्याबाबत तसेच माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार या स्पर्धेची माहिती देण्यासाठी व आधार लिंक करण्यासाठी दालन उभारण्यात आले होते. या दालनाद्वारे जवळपास 41 मतदारांचे आधार लिंक करण्यात आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply