Breaking News

केळवणे गटातून महेश बालदींना मताधिक्य देणार -किरण माळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

केळवणे जिल्हा परिषद गटातून जेएनपीटीचे विश्वस्त व उरण विधनसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना तीन ते चार हजारांचे मताधिक्य देऊ, असा विश्वास भाजपचे केवळणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष किरण माळी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, महेश बालदी यांनी आमदार नसतानाही मतदारसंघात कोट्यवधीची कामे केली आहेत. पाचशे कोटींहून अधिक रुपयांचा विकासनिधी त्यांनी स्वतःच्या ताकदीवर आणला आहे. अशी व्यक्ती आमदार झाली, तर या मतदारसंघाचा कायापालट होईल, त्यामुळे आम्ही महेश बालदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. विरोधकांकडून बालदी यांच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे, पण जनता या अपप्रचाराला बळी पडणार नाही. सर्वांनीच या वेळी महेश बालदी यांना विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. केळवणे जिल्हा परिषद गटात नियोजनबद्ध रीतीने प्रचार सुरू आहे. त्यामुळे या गटातून मोठी आघाडी आम्ही बालदी यांना देऊ, असे भाजपचे केवळणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष किरण माळी

यांनी सांगितले. महेश बालदी हे सर्वसामान्यातील नेतृत्व आहे. सामान्य माणासाच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. अडचणींच्या वेळी धावून येतात. त्यामुळे त्यांच्यासारखा माणूस विधानसभेत जाणे अत्यंत गरजेचे आहे. महेश बालदी यांच्या रूपाने उरणचा आमदार विधानसभेत पोहोचला, तर उरणचे उर्वरित प्रश्न मार्गी लागतील. जेएनपीटी व अन्य प्रकल्पांमुळे उरणला मोठे व्यापारी महत्त्व येत आहे. या शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे, त्यासाठी बालदी हे सक्षम नेतृत्व असून त्यांना विजयी करण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे किरण माळी यांनी सांगितले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply