Breaking News

खाजगी क्लासमध्ये तरुणीवर अत्याचार

पनवेल ः बातमीदार

खारघरमधील एका नामांकित खाजगी क्लासमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणार्‍या 18 वर्षीय तरुणीवर त्याच क्लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कोपरखैरणे भागात राहणारी पीडित तरुणी वाशीतील एका कॉलेजात शिक्षण घेत आहे. ही तरुणी ऑगस्ट महिन्यापासून नेरूळ येथील नामांकित खाजगी क्लासमध्ये सुपरवायझर म्हणून पार्टटाइम काम करत होती. 22 सप्टेंबर रोजी पीडित तरुणीला खारघर येथील क्लासमध्ये पाठविण्यात आले होते. तेथून सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही तरुणी घरी जाण्यासाठी निघाली असताना, क्लासमध्ये असलेल्या दीपेश जैन याने क्लासरूमचा दरवाजा आतून बंद करून तिच्याशी अश्लील चाळे केले, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या वेळी पीडित तरुणीने प्रतिकार करून दीपेश जैनच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर पीडितेने स्वतःचे घर गाठून घडल्या प्रकाराची माहिती क्लास व्यवस्थापनाला दिली, मात्र तिच्या तक्रारीची कुणीही दखल घेतली नाही. उलट अनुप शुक्ला या वरिष्ठाने पीडित तरुणीला हॉटेलवर भेटण्यासाठी बोलावले. अखेर पीडितेने मंगळवारी आईसह खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी दीपेश जैन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक भोईर यांनी सांगितले.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply