Breaking News

शेकापला खिंडार; भाजपत जम्बो भरती; विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे व्यापक व दिशादर्शक धोरण आणि विकासकामे पाहता विविध पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषकरून शेकापला पनवेलच्या ग्रामीण भागात खिंडार पडले असून, गावोगावचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे खानाव, पिसार्वे, खुटारी, सुकापूर, वारदोली, तारटेप ठाकूरवाडी, हालटेप ठाकूरवाडी, मिसळवाडी, माची प्रबळ, मोर्बे, महोदरवाडी आणि पनवेल महापालिका प्रभाग 17मधील शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन भाजपत स्वागत केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमांना भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष वासुदेव घरत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे आदींसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन खानाव येथील शेकापचे दत्तात्रेय तातरे, नरेश वारदे, नामदेव भोपी, सोमनाथ वारदे, बाबूराव बोलडे, जयेंद्र तातरे, निलेश भोपी, विलास भोपी यांनी या वेळी भाजपचा झेंडा हाती घेतला. खानावचे माजी सरपंच शशिकांत दिसले, लहू पाटील, दत्तात्रेय वारदे, गणू मुंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाराम पाटील, युवा कार्यकर्ते संदीप पाटील, दीपक तवले, तुळशीराम तातरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार दौर्‍यात कानपोली व वलप येथील शेकाप, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. (पक्षप्रवेशाच्या अन्य बातम्या व छायाचित्रे पान 3 वर..)

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply