Breaking News

मुस्लिम समाजही महायुतीच्या पाठीशी; उर्दू भाषेतील प्रचारपत्रकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिम समाजही त्यांच्या विजयासाठी एकवटला आहे. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याची माहिती देणार्‍या उर्दू भाषेतील प्रचारपत्रकाचे शुक्रवारी (दि. 18) त्यांच्याच हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रचारपत्रक प्रकाशन समारंभास भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष मन्सूर पटेल, जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. इर्शाद शेख, जॉइंट सेक्रेटरी मोहसीन कर्नालकर, शहर चिटणीस निसार सय्यद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमबहुल भाग म्हणजे तळोजा, ओवा, ओवा पेठ, नवीन पनवेल, कामोठे, खारघर व पनवेल शहरातील नऊ मोहल्ले असून, या सर्व भागांतून मुस्लिम बांधव महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देण्यासाठी प्रचारात जोमाने उतरल्याचे दिसून येते.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply