अलिबाग : जिमाका
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना सोमवारी अलिबागपासून 10 ते 20 किमीच्या परिसरातील मतदान केंद्रावर रुग्णवाहिकेद्वारे पोहचवून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व नगरपालिकेच्या वतीने चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सोमवारी दुपारपर्यंत आठ रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी या सुविधेचा लाभ घेतला.