Breaking News

केंद्रीय गृहमंत्री शाह रविवारी सिंधुदुर्गमध्ये

कुडाळ : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (दि. 7) कोकणात येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी शाह येणार आहेत. दुपारी 2 वाजता हा सोहळा होणार आहे.
कुडाळ तालुक्यातील पडवे गावात 70 एकर खासगी जमिनीवर नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेज उभारले आहे. उद्घाटन समारंभास राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण तसेच अनेक आमदार, खासदार व भाजपची नेतेमंडळीही उपस्थित राहणार आहेत.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply