Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचा रेल्वे प्रवाशांशी संवाद

समस्या घेतल्या जाणून, अधिकार्‍यांना केल्या सूचना

पनवेल ः रामप्रहर वृत्त

दरदिवशी पनवेल रेल्वे स्थानकातून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) रेल्वे स्थानकाची पाहणी करून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

पनवेल व आजूबाजूच्या परिसरात असलेले व आगामी काळात निर्माण होणारे प्रकल्प पाहता प्रवासाच्या दृष्टीने पनवेल रेल्वे स्थानक महत्त्वाचे मानले जाते. या स्थानकातून प्रवाशांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाशी संपर्क आणि पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मंगळवारी केलेल्या पाहणीतून रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त सेवा देण्याची सूचना प्रशासनाला केल्या आहेत, तसेच प्रवाशांची वाढती वर्दळ लक्षात घेता बाहेरील बाजूस असलेली रिक्षा व्यवस्था वाहतूक कोंडीच्या दृष्टिकोनातून सुरळीत करावी. प्रथमोपचाराच्या अनुषंगाने बाहेरील क्लिनिक आतल्या बाजूस घेऊन या क्लिनिकची संख्या वाढविण्यात यावी. त्याचबरोबर फलाट क्रमांक चारवर असलेल्या अरुंद व विरुद्ध जिन्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या जिन्याची योग्य दिशा करण्याची मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली. त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी अधिकार्‍यांशी चर्चा केली.

या वेळी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, नगरसेविका सुशिला घरत, माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी, प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, श्रीकांत बापट, रवींद्र नाईक, किशोर मोरे आदी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply