Breaking News

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल पोदी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळा क्र. 8 येथे अक्षयपात्र फाऊंडेशन यांच्या तर्फे मंगळवारी (दि. 1)सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट वाटप करण्यात आले. या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळेने पालकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर मार्क करून प्रत्येक पालकांना सॅनिटायझरचा वापर व प्रत्येकाला मास्क अनिवार्य आहे याची जाणीव करून दिली. या कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा डामरे व सर्व शिक्षकवृंद, अक्षयपात्र फाऊंडेशनचे देडे आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply