Breaking News

म्हसळा वाचनालयात बालदिन

म्हसळा : प्रातिनिधी

येथील तालुका सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी बालदिना निमित्त म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय म्हणजे काय? वाचन चळवळीचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व  या विषयी माहिती देण्यात आली.

बालदिनाच्या निमित्ताने न्यू इंग्लीश स्कूलच्या सातवीतील  विद्यार्थ्यांनी गुरूवारी म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाला   भेट दिली. शिक्षिका सविता शिंदे व शिक्षक चंद्रकांत गांजरे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, धनश्री नाक्ती यानी ग्रंथालय निर्मिती ते वाचक चळवळ या विषयी माहिती दिली. यावेळी ईश्वरी बनकर, निधी गावडे, समरीन शहा व अन्य विद्यार्थ्यानी विचारलेल्या शंकाचे ग्रंथपाल उदय करडे व लिपीक धनश्री नाक्ती यांनी निरसन केले.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply